गेवराई (रिपोर्टर) विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधू वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.24 जुलै रोजी गेवराई येथे मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरात अद्यावत टेक्नॉलॉजीद्वारे फायबरपासून तयार केलेले अत्यंत हलके व मजबुत कृत्रिम हात व पाय दिव्यांगांना मोफत दिले जाणार आहेत. शिबीरासाठी गरजूंनी नोंदणी करण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केले आहे.
शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरितीने राबविण्यात आले आहेत. रविवार, दि.24 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गेवराई शहरात मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या उपकम्राचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त गरजू दिव्यांगांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले आहे. शारदा प्रतिष्ठान आणि साधू वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबीरात रविवार, दि.24 जुलै रोजी दिव्यांगांची तपासणी करून कृत्रिम हात आणि पाय बसविण्यासाठी आवश्यक मोजमापे घेण्यात येणार आहेत. हे कृत्रिम अवयव बसविल्यानंतर मनुष्य चालू शकतो, सायकल चालवू शकतो, टेकडी चढू शकतो व सर्व दैनंदिन कामे करू शकणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. मोफत कृत्रिम हात व पाय शिबीरासाठी मोबाईल क्र. 9420422224, 9423714847, 9767894229 व 9822459100 या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी असे सांगून शिबीरामध्ये सहभागी झालेल्या दिव्यांगांना अवयवाची मोजमापे घेतल्यानंतर सुमारे 40 दिवसांनी प्रत्यक्ष कृत्रिम अवयवाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, त्यामुळे गरजूंनी या शिबीराचा जास्तीत जास्त नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले आहे.