Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडलग्न लावून देत नसल्याने तरुणाने केला मुलीच्या वडिलाचा खून, आरोपीच्या अटकेसाठी मृतदेह...

लग्न लावून देत नसल्याने तरुणाने केला मुलीच्या वडिलाचा खून, आरोपीच्या अटकेसाठी मृतदेह ठाण्यासमोर ठेवला


केज (रिपोर्टर): तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून का देत नाही? या कारणावरून एकाने मुलीच्या वडिलास लोखंडी रॉडने मारून गंभीररित्या जखमी केले होते. जखमीवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मुलीच्या वडिलाचा मृत्यू झाला. आरोपीच्या अटकेसाठी मृतदेह केज पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला आहे. ठाण्यासमोर अनेक नातेवाईक एकत्रित आले होते.

तांबवा येथील भागवत ताटे हा युवक १७ वर्षीय वयाच्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत का लावून देत नाही या कारणावरून गेले काही दिवस मुलीच्या वडिलाशी हुज्जत घालत होता. मुलीचे वडिल रमेश नेहरकर (वय ४५ वर्षे) हे साने गुरूजी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वस्तीगृहाचे सेवक म्हणून कार्यरत होते. रमेश नेहरकर त्यांच्या मोटारसायकल क्र. एम.एच. ४४ एफ ४८३२ यावर कळंबहून केजकडे येत होेते. शनिवारी दुपारी ३.३० वा. एका डिस्कव्हर मोटारसायकलवरून आलेल्या भागवत चाटे व इतर दोघांनी त्यांचा पाठलाग केला. या मार्गावरील फरिद बाबा दर्गा आणि संत सेना महाराज मंदिराच्या दरम्यान हल्लेखोरांनी चालत्या गाडीवरील रमेश नेहरकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. ते यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. आरोपीच्या अटकेसाठी मृतदेह केज पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!