• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

गेवराईत पुन्हा रंगणार पंडित-पवार-पंडित तिरंगी सामना

by गणेश सावंत
November 5, 2024
Reading Time: 1 min read
0
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

तीन महिलांसह 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ; 25 जणांची माघार

गेवराई (रिपोर्टर) निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत काल संपली असल्याने गेवराई विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सोमवारी 25 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने आता उर्वरित 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आसून गेवराई मतदार संघात पुन्हा एकदा पंडित-पवार-पंडित असा तिरंगी सामना होणार असल्याचे दिसून येत आहे.


   सोमवारी या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असून आता निवडणूक प्रचाराला वेग आला असून  दरम्यान यावेळी प्रस्थापित असलेल्या पंडित-पवारांना विस्थापित पुजा मोरे, मयुरी मस्के-खेडकर, प्रियंका खेडकर या विस्थापित असलेल्या महिलांचे ही आवाहन असले तरी मुख्य लढत ही पंडित-पवार-पंडित अशीच होणार असल्याने या तिघांमध्ये कोण सरस ठरेल हे निकालानंतरच दिसून येईल. गेवराई विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी 46 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत सोमवारी संपणार होती. त्यामुळे अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार 46 उमेदवारांपैकी 25 उमेदवारांनी माघार घेतली असल्याने आता 21 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून प्रमुख पक्षांसह अपक्षांना सायंकाळी पाच वाजता गेवराई निवडणूक निरीक्षक लालनपुई वाँगचाँग, निवडणूक निर्णय अधिकारी सतिश धुमाळ, तहसीलदार संदीप खोमणे, विक्रम मांडुरके यांनी निवडणूक चिन्हांचे वाटप केले. दरम्यान या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून प्रामुख्याने हि लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे बदामराव पंडित व अपक्ष उमेदवार लक्ष्मण पवार यांच्यात होईल तसेच या निवडणुकीत मनसेच्या मयुरी खेडकर, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पुजा मोरे, वंचितच्या प्रियंका खेडकर यांच्यासह अपक्ष निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार किती मते घेतील आणि हे कुणाला फायद्याचे अन कुणाला तोटा करतील हे निकालानंतर दिसून येईल. तसेच त्यांना मराठा आरक्षण चळवळीतील ऋषीकेश बेदरे यांनी जरांगे पाटलांनी आदेश दिल्यानंतरही आपली उमेदवारी मागे घेतली नसून त्यांचे देखील निर्णायक आव्हान हे प्रमुख उमेदवारांना असणार आहे. त्याचबरोबर ऍड.सुरेश हात्ते, ओबीसी बचाव आरक्षण चळवळीतील परमेश्‍वर वाघमोडे, पी.टी.चव्हाण यांनी देखील माघार न घेतल्याने त्यांची कोणाला डोकेदुखी ठरतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


9 पक्षाच्या उमेदवारांसह हे 12 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे बदामराव पंडित, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पुजाताई मोरे, मनसेच्या मयुरी मस्के-खेडकर, वंचितच्या प्रियंका खेडकर, संपूर्ण भारत क्रांती पार्टीचे दिलीप चांदणे, जनहित लोकशाही पार्टीचे परमेश्‍वर वाघमोडे, भारतीय युवा जन एकता पार्टी भीमा कानधरे, रासपा मतकर अण्णासाहेब या पक्षाच्या 9 उमेदवारांसह अपक्ष म्हणून माजी आ.लक्ष्मण पवार, ऋषीकेश बेदरे, अशोक खेडकर, अँड. अंबादास जाधव, संजय काळे, पि.टी. चव्हाण, पवार लक्ष्मण अंबादास, पवार लक्ष्मण विठोबा, बदाम गोर्डे, मनोहर चाळक, राजेंद्र डाके, सुरेश हात्ते हे एकुण 21 उमेदवार गेवराई विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत.

चौकट –
——————–
 लक्ष्मण पवारांना मिळाले अँटोरिक्षा चिन्ह
————–
उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदरांना तीन मुक्त चिन्ह पसंती प्राधान्यक्रमाने मागण्याचा अधिकार आहे. दरम्यान लक्ष्मण पवार यांच्यासह मनोहर चाळक व पी.टी.चव्हाण या तिघांना प्रथम  पसंती म्हणून अँटोरिक्षा या चिन्हाची मागणी, केली होती त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या तिघांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बरणीत टाकुन त्यामधील एक चिठ्ठी लहान मुलाच्या हस्ते काढण्यात आली. हि चिठ्ठी लक्ष्मण माधवराव पवार यांची निघाल्याने त्यांना अँटोरिक्षा चिन्ह देण्यात आले.

Previous Post

चाळीस वर्षानंतर प्रथमच जयदत्त क्षीरसागरांवर माघार घेण्याची नामुष्की! पुतणे झाले वरचढ, राजकारणाला लागली घरघर

Next Post

शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंनी नारायणगडावर वाढवले 101 नारळप्रचाराचा शुभारंभ

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंनी नारायणगडावर वाढवले 101 नारळप्रचाराचा शुभारंभ

शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंनी नारायणगडावर वाढवले 101 नारळप्रचाराचा शुभारंभ

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?