बीड, (रिपोर्टर)ः- सिमेंट घेवून निघालेल्या टॅम्पोखाली पोलिस कर्मचारी आल्याने सदरील कर्मचारी जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज सकाळी शहरातील पांगरी रोडवर असलेल्या अंबिका चौक भागात घडली.
टॅम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सुनिल घोळवे (वय 54 वर्षे) हे आज सकाळी स्कुटी क्रं. एम.एच44.ए.ए.9076 यावर पांगरी रोडवरून अंबिका चौक या कडे येत होते. अंबिका चौकातून पांगरी रोडकडे सिमेंट घेवून निघालेल्या टॅम्पोच्या खाली सुनिल घोळवे यांची स्कुटी आल्याने यामध्ये घोळवे हे टायरखाली आल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.