बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. या मशीन लाईटवर चालतात. लाईट गेल्यानंतर ग्राहकाचे पैसे एटीएममध्ये आडकून पडू लागले. काल बशीरगंज भागातील एसबीआयच्या एटीमध्ये एका ग्राहकाचे पैसे अडकले होते. या बाबत संबंधितांनी बॅकेकडे तक्रार केली होती. एटीएम मशीनमध्ये बॅटरी, इनव्हर्टर बसविणे गरजेचे आहे. लाईट गेली तरी बॅटरीचा वापर होवू शकतो.
एसबीआय बॅकेंसह इतर बँकेचे शहरामध्ये अनेक ठिकाणी एटीएम मशीन आहेत. या मशीन लाईटवर चालतात. लाईट गेल्यानंतर ग्राहकाचे पैसे मशीनमध्ये आडकून पडू लागले. शहरातील बशीरगंज भागात असलेल्या एसबीआयच्या एटीएम मशीनमध्ये एक्या ग्राहकाचे पैसे अडकले. याबाबत ग्राहकाने बँकेमध्ये तक्रार केली होती. मशीनमध्ये बॅटरी इनव्हर्टर बसविल्यास पैसे अडकणार नाहीत. त्यासाठी संबंधित बॅकेंने काळजी घेणे गरजेचे आहे.









