बीड, (रिपोर्टर)ः- विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागला. यामध्ये महाआघाडीची धुळेधान उडाली. एवढा दारून पराभव होवूच शकत नाही. ईव्हीएममध्ये काही तरी घोळ आहे असा आरोप महाआघाडीच्या नेत्याकडून केला जात आहे. ईव्हीएम मशीनचा वापर बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी होवू लागली. ईव्हीएम मशीनच्या विरोधात 5 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे.मशीनची प्रेत यात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला पट्टयाबांधून निशेष करण्यात येणार असल्याचे भाई गंगाभिषण थावरे यांनी म्हंटले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अतिरिक्त बहुमत मिळाले. महाआघाडीचा एवढा दारून पराभव होवूच शकत नाही. मशीनमध्ये काहीतरी घोळ आहे असा आरोप महाआघाडीच्या नेत्याकडून केला जात आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात ईव्हीएम मशीन बंद करावी अशी मागणी केली जावू लागली. ईव्ही एम मशीनच्या विरोधात 5 डिसेंबर रोजी बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. ईव्हीएम मशीनची प्रेत यात्रा काढण्यात येणार असल्याचे भाई गंगाभिषण थावरे यांनी म्हंटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला पट्ट्या बांधून निषेध करण्यात येणार असल्याचे थावरे यांनी सांगितले.









