वडवणी(रिपोर्टर):- एका हाँटेलमध्ये जेवण करत आसताना झालेल्या हमरी तुमरीच्या भांडणाचे रुपांतर सिनेस्टाईल मारहाणमध्ये झाले असुन दोन्ही गटा विरोधात हाफ मर्डर आणि अँट्रोसिटी सह मारहाणीचे परस्पर गुन्हे वडवणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.तर सदरील घटना बीड रोडवरील एका हाँटेलमध्ये दि.29 जुलै रोजी झाली आहे.
रोहिदास गोंविद पवार हे हाँटेलमध्ये जेवण करत आसताना किरण उर्फ आमदार मुक्तीराम उजगरे टेबल जवळ आला व म्हणाला तू माझ्याकडे काय पाहतोस अस म्हणत शिवी देत दोघांमध्ये भांडण सुरु झाले यात रोहिदास पवार याला चाकूने मारहाण करुन जखमी केले म्हणून रोहिदास पवार याने किरण उजगरे यांच्या विरोधात हाफ मर्डर अणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत.तर किरण उर्फ आमदार मुक्तीराम उजगरे यानी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि,रोहिदास पवार हा हायवेवर आला व मला जातीयवाचक बोलून तुम्ही लय माजला आहेत.अस म्हणत नारायण गिन्यादेव राठोड,सुनिल पवार,रोहिदास पवार यांचा मुलगा व इतर 4 ते 5 जणांना मोबाईलवर बोलवून घेत मारहाण केली म्हणून किरण उजगरे यांच्या फिर्यादीवरुन अट्रोसिटी गुन्ह्यासह मारहाणीचे गुन्हे वरील व्यक्तीवर दाखल करण्यात आले आहेत.अट्रोसिटी प्रकरणात डिवायएसपी पंकज कुमावत तर हाफ मर्डर प्रकरणी पीएसआय यादव तापास करीत आहत.तर दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीत.अस वडवणी पोलीसांनी सांगितले आहे.