
बीड, (रिपोर्टर) ः पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप नागरिकांप्रति सदभावना व्यक्त करण्यासाठी व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली निघाली होती. या रॅलीचा समारोप महिला कॉलेज या ठिकाणी करण्यात आला. रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्या प्रति सदभावना व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बीड शहरामध्ये सकाळी रॅली काढण्यात आली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅली निघाली होती. रॅलीचा समारोप महिला कॉलेज या ठिकाणी करण्यात आला. दरम्यान, रॅलीपूर्वी भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
000








