
रियल मी कंपनीचा मोबाईल चोरला
बीड, (रिपोर्टर) ः सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे चोर्या होत आहे. आता जिल्हा रुग्णालयातील वार्डातही चोर्या होऊ लागल्या. रुग्णालयातील वार्ड क्र. 45 मध्ये चोरट्याने एका महिलेचा मोबाईल चोरला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशाबाई संजय मुंडे रा. निवडंगवाडी ता.केज ही महिला आपल्या मुलीस प्रस्तुतीसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन आली होती. सदरील महिलेच्या मुलीचा मोबाईल आरोपी शेख इवान शेख रशिद रा. शिवाजीनगर, अंबाजोगाई याने चोरला तसेच सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी आशाबाई मुंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी इवान याच्या विरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






