
एकावर खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
लागलेली गुन्हा दाखल असून दुसर्यावर पॉकेटमारी आणि इतर सोळा गुन्हे तर तिसरा हमाल देत होता त्यांना टीप
केज पोलिसांनी केले कौतुक स्पदक कार्य…
केज (रिपोर्टर) केज येथील बस स्थानकावरील वारंवार होणार्या चोर्या रोखण्यात पोलिसांना यश मिळाले असून पोलिसांनी तिघांची टोळी ताब्यात घेतली आहे. या पकडलेल्या आरोपी पैकी एकावर खुनाचा गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची असून तो गेल्यावर कारागृहातून पॅरोलवर सुट्टीवर आल्यापासून पुन्हा कारागृहात गेलेला नव्हता. तो फरार होता. तर दुसरा आरोपी हा त्याच्यावर राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे आणि इतर एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. तर तिसरा मात्र केज बस स्थानकात हमाली करणारा हमाल असून तो त्यांना प्रवाशांची माहिती देत होता.
दि. 11 जून रोजी सकाळी 11:00 वा. चे सुमारास अमरजीत विजयकुमार धपाटे ही त्यांचे कॉफी शॉपचे कॉफी मटेरीअलचे पार्सल आनण्यासाठी बसस्थानक केज येथे गेले होते. ते बसची वाट पाहत थांबलो असता तेथे दोन अनोळखी ईसम माझ्या जवळ आले व त्यांनी तुमच्याकडे माझे काम आहे असे म्हणाले आणि त्यांना बसस्थानाकाचे बाजुला कोप-यात घेवुन गेले. त्यापैकी एकाने त्याचे कंबरेतुन एक चाकु काढले व माझ्या गळयाला लावुन तुझ्या खिशातील जेवढे पैसे आहे ते काढुन दे. नाही दिले तर जिवेच मारुन टाकुत अशी धमकी दिली. त्या तिघांनी बळजबरीने त्याच्या खिशातील 2 हजार रुपये काढुन घेतले. त्या नंतर अमरजित धपाटे याने आरडा ओरड केली ते ऐकून असता बसस्थानक मधील काही लोक आणि बस स्टँड परिसरातील पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल विष्णू नागरगोजे प्रवाशी धावून आले. पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल विष्णू नागरगोजे पोलिसांनी त्यांच्या मदतीने पळून जाणार्या तिघांच्या मुसक्या आवळल्या. ताब्यात घेतलेले संशयितांची नावे अन्वर ऊर्फ असलम दस्तगीर सय्यद, (रा. वडसावीत्री नगर परळी ता. परळी जि.बीड), अंबादास सुखदेव साळोकार, वय (44 वर्ष), (रा. घारपुरी ता. खामगाव जि. बुलढाणा) आणि हमीद दाऊत शेख, (रा. धारुर जि. बीड) अशी आहेत.