
चकलांबा(रिपोर्टर)- बहिणीला त्रास का देतो, म्हणत चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीत एका इसमाला डोक्यात कुकर घालून मारहाण करण्यात आली.
चकलांबा मध्ये काल संध्याकाळी 7 वाजता भारत घाडगे यांच्या हॉटेल समोर गणेश प्रभाकर शिंदे वय 35 रा. चकलांबा यांना गणेश मोहन निंबाळकर व शिवाजी दशरथ जाधव रा. चकलांबा यांनी डोक्यात कुकर मारून रक्तबंबाळ केले असून लाथा बुक्क्याने मारहाण केली. व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून चकलांबा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फरार असून पुढील तपास चकलांबा पोलीस स्टेशनचे पोलीस गुजर करत आहेत.