
सुर्देवाने कोणतीही हानी नाही, अग्निशामक दलाने आग विझवली
बीड, (रिपोर्टर)ः- नगर रोड वरील पोलीस पेट्रोल पंपासमोरील एका हॉटेलमधील गॅसने पेट घेतला. स्वयंपाक घरात आग लागल्याने आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. वेळीच आग अटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपासमोर मैत्री साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. या हॉटेलमधील गॅस लिक झाल्याने आग लागली. या आगीमुळे एकच धावपळ निर्माण झाली होती. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक दलाचे किशोर जाधव, कृष्णा जंगले, अनिकेत कपाळे यांनी आग विझवली. आग विझवण्यासाठी इसा चाऊस यांनी देखिल मदत केली. या आगीत स्वयंपाक घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. वेळीच आग अटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. सुर्देवाने यात कोणतीही हानी झाली नाही.






