,

तीन ठार, एक जखमी
अंबाजोगाई (रिपोर्टर): भरधाव वेगात जाणार्या दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री साडेसात ते आठच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर -हातोला रस्त्यावरील लिमगाव पाटीजवळ घडली. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही दुचाकी पुर्णत: चक्काचूर झाल्या. स्थानीकांना जेव्हा या अपघाताची माहिती कळली तेव्हा त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. यातील एका जखमीवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रगुणालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर-हातोला रस्त्यावर रात्री लिमगाव पाटीजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. दोन्ही मोटारसायकल भरधाव वेगात असल्याचे अपघातानंतरचे चित्र पाहिल्यानंतर दिसून येते. दोन्ही मोटारसायकलचा चक्काचुरा झाला आहे. या अपगातात बर्दापूर येथील सतीश चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर समोरून येणार्या दुचाकीवरील फारुक रहेमान खॉ पठाण आणि नासिर खाजामिया शेख (दोघे रा. पानगाव) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी लातूरकडे घेऊन जात असताना या दोघांचा रस्त्यामध्ये मृत्यू झाला. सतीश चव्हाण याच्या सोबत असलेला ऋषिकेश अशोक चव्हाण हा तरुण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती अंबाजोगाई पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पोलीस पंचनामा केल्याचे सांगण्यात येते.









