
बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहरातील होल्डींग काढण्याच्या कारणावरून न.प.कर्मचारी व एका तरूणाचा वाद निर्माण झाला होता. या वादावरून नगर पालिका कर्मचार्यांनी आज कामबंद आंदोलन केले होते.
शहरातील शिवराज पान सेंटर परिसरामध्ये लावण्यात आलेले बॅनर काढत असतांना शैलेश नामक तरूण व न.प.कर्मचार्याचा वाद निर्माण झाला होता. या वादावरून आज सर्व न.प. कर्मचार्यांनी आंदोलन केले. कामकाज बंद करून कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते.






