
ग्रामीण पोलिसांची कारवाई
बीड (रिपोर्टर): पाली शिवारातून ट्रॅक्टरमध्ये वाळू जात असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी सदरील ट्रॅक्टर पकडून ट्रॅक्टरसह वाळू जप्त केली आहे. त्याचबरोबर एका ट्रकमध्ये वाळू जात असल्याने सदरील ट्रकही पकडण्यात आला.
पाली शिवारातून एका ट्रॅक्टरमध्ये अनाधिकृत वाळू जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांना झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश मुंडे, आतिष मोराळे, नामदेव सानप या कर्मचार्यांनी ट्रॅक्टर पकडला. या ट्रॉलीमध्ये वाळू आढळून आली. वाळुसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. ट्रॅक्टरसह अन्य एक ट्रकही पकडण्यात आला. ट्रक क्र. एम.एच. 14 ई. एम. 7677 हा ताब्यात घेण्यात आला. ट्रक जप्त करण्यात आला आहे. दोन्ही वाहनांविरोधात कारवाई करण्यात आली.






