धाराशीवहून जाधव बीडला तर सिंदुधुर्गहून काळे पंचायत विभागाला
बीड (रिपोर्टर): राज्य सरकारने काल विकास सेवेतील अधिकार्यांच्या बदल्या केल्या. बीड जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांची याच पदावर संभाजीनगर जिल्हा परिषदला बदली करण्यात आली आहे तर पंचायत विभागाचे ज्ञानोबा मोकाटे यांची नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे गटविकास अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. बीड येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विलास जाधव आणि सिंधुदुर्ग येथून किशोर काळे हे बीड जिल्हा परिषदेला बदलून आले आहेत.
गेल्या चार वर्षांपासून वासुदेव सोळंके हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. शांत, संयमी आणि प्रशासनात कठोर अशी ओळख त्यांची आहे. कर्मचार्यांशी त्यांचे समन्वयाचे संबंध होते. ज्ञानोबा कोकाटे हे गेल्या साडेतीन वर्षांपासून पंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. दोघांचीही प्रशासकीय बदली करण्यात आलेली आहे. धाराशीव येथून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यापदावर कार्यरत असणारे विलास जाधव यांची बीड जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुक्य कार्यकारी अधिकारी म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी किशोर काळे याची बीड येथे पंचायत विभागात बदली करण्यात आलेली आहे.









