
उद्या बीडमध्ये कुरेशी समाजाचा मेळावा
हाजी अराफत सह आदींची उपस्थिती राहणार-जावेद कुरेशी
बीड, (रिपोर्टर)ः-तथाकथीत गोरक्षकाच्या त्रासाला कंटाळून आणि पोलीस प्रशासनाकडून चुकीच्या कारवाया होत असल्याने कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार घातलेला आहे. हा बहिष्कार अजुनही सुरूच आहे. या बहिष्काराला राज्य मुस्लिम खाटीक संघटनेने आपला पाठींबा दर्शवला असून या संदर्भात उद्या दि.11 ऑगस्ट रोजी सायं.6 वाजता बीडमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले अशी माहिती खाटीक समाजाचे जावेद कुरेशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्यात खाटीक समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घातलेली आहे. तथाकथीत गोरक्षकाने धुमाकूळ घालत व्यापार्यांना जाणीव पुर्वक त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडूनही चुकीच्या कारवाया होत आहेत. खाटीक समाजाचा बहिष्कार अजुनही सुरूच असुन या बहिष्काराला राज्य मुस्लिम खाटीक संघटनेने पाठींबा दर्शवला असून या संदर्भात उद्या 11 सप्टेंबर रोजी सायं.6 वाजता आशिर्वाद लॉन्स या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला हाजी अराफत यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात पुकारलेल्या बंद संदर्भात चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे गोरक्षकांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल आणि पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाबद्दल तक्रार करण्यात येणार असल्याचेही कुरेशी व इतर पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.








