
अप्पर आयुक्त कोथिंबिरे लवकरच पदभार स्विकारणार
बँकेला चांगले दिवस येणार
बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तब्बल 10 वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. या प्रशासक राजात डबघाईला आलेली बँक, तिचा कारभार सुधारत नसल्याने 6 तारखेला अजितदादा पवारांनी घेतलेल्या बैठकीत राज्याचे सेवानिवृत्त अप्पर आयुक्त कोथिंबिरे यांची बँकेच्या कारभार सुधारण्यासाठी नियुक्ती होणार आहे.
राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 6 ऑगस्ट रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक घेतली. 2011 ते 2016 आणि 2020 ते आजतागायत डबघाईला आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासकराज सुरू आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जिल्हा विशेष लेखा परिक्षक तत्कालीन कांबळे यांनी बँकेवर प्रशासक म्हणून काम केले. त्यानंतर महसूल विभागातील अप्पर जिल्हाधिकारी आणि आता जिल्हाधिकारी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांचे प्रशासकीय संचालक मंडळ आहे. तरीही जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही. वसुलीचे प्रमाण अगदी नगन्य आहे. ही बाब अजित पवारांच्या लक्षात आल्यानंतर राज्याचे अप्पर सहकार आयुक्त कोथिंबिरे यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोथिंबिरे यांची नियुक्ती झाल्यानंतर पुणे आणि सोलापूर या डबघाईला आलेल्या बँकेचा कारभार सुधारल्यामुळे बीड जिल्हा बँकेचा कारभरा सुधारर्यास नक्कीच मदत होईल.






