
पोलिसांच्या मॅरेथॉनमध्ये दहा हजार कर्मचार्यांसह नागरीकांचा सहभाग
बीड, (रिपोर्टर)ः- नशामुक्त बीड, तंदुरूस्त बीड यासाठी बीड पोलीस दलाकडून जनजागृती करण्यात येत आहे. काल शहरातून जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. आज पहाटे चर्हाटा रोड मार्गे मॅरेथॉन आयोजित केले होते. यात पोलीस कर्मचार्यासह नागरीकांचा सहभाग होता. जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर सह आदी कर्मचारी व इतरांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. जवळपास दहा हजारांपेक्षा जास्त नागरीक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होते.

13 ते 17 ऑगस्ट या दरम्यान बीडमध्ये पोलीस प्रशासनाकडून नशा मुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी जनजागृती केली जावू लागली. काल शहरातून पोलीस प्रशासनाने रॅली काढली होती. आज पहाटे चर्हाट रोड मार्गे मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणापासून या मॅरेथॉनला सुरूवात झाली होती. यामध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, पोलीस अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सर्व सामान्य नागरीक, विद्यार्थी यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.








