
सोयाबीनला आठ तर कापसाला बारा हजार भाव द्या -घाडगे
बीड (रिपोर्टर): महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन सरकारने अद्यापही पाळले नसून एक महिन्याच्या आत शेतकर्यांची कर्जमाफी करावी, तसेच सोयाबीनला आठ तर कापसाला दहा ते बारा हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी अकिल भारतीय छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी केली आहे.
घाडगे हे बीड येथे आले असता आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष अशोक रोमणसह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना घाडगे म्हणाले की, शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले हातेे. मात्र या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. शेतकर्यांना एक महिन्यामध्ये कर्जमाफी द्यावी तसेच सोयाबीनला आठ हजार रुपये व कापसाला दहा ते बारा हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. प्रशासन आणि शासन निर्ढावलेले असून शेतकर्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. हे प्रश्न सोडवले नाही तर नेत्यांना गावबंदी करू, असा इशारा देखील त्यांनी या वेळी दिला आहे.






