
महसूल विभागाचा घेणार आढावा
बीड (रिपोर्टर): सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हा दौर्यावर येत असून ते या दौर्यात जीवन सातबारा मोहीम, महसूल विभागातील रिक्त पदांचा आढावा, फेरफार नकलांचा आढावा इत्यादी महसूल विभागाचा आढावा ते घेणार आहेत. त्यांच्या दौर्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन जय्यत तयारीला लागलेले आहे.
जिल्हा प्रशासन आणि महसूलमंत्री हे अत्यंत जवळचे नाते आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय अधिकार्याकडून पीपीटी स्वरुपात जीवन सातबारा मोहीम व इतर महसूल कामांचा अहवाल तयार करून घेत आहेत. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होत असून या दौर्याच्या अनुषंगाने आत्तापर्यंत झालेली कामे, उर्वरित पेंडिं असलेली कामे आणि जिल्ह्यात महसूल अधिकारी अणि कर्मचारी यांच्या किती रिक्त जागा आहेत याबाबतचा अहवाल तयार करण्यात येत आहेे.





