कत्तीचा धाक दाखवत केली मारहाण
बीड, (रिपोर्टर)ः- शिरूर कासार मध्ये 23 तारखेला एक धक्कादायक प्रकार घडला. पैसे का दिले नाहीस म्हणून एका व्यक्तीला गाडी मध्ये डांबून निर्जन ठिकाणी जाऊन मारहाण केली असून, शिरूर कासार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तात्या मोतीराम लोखंडे वय 42 वर्षे, रा. आरोळे,जामखेड हे सध्या झापेवाडी फाटा, शिरूर येथे राहतात. यांना आरोपींनी लोक जमवून त्यांना गाडीत डांबून आमच्या वर दाखल केलेली फिर्याद परत घे, व बिसीचे पैसे का दिले नाहीस म्हणून त्यांना निर्जन ठिकाणी जाऊन तिथे त्यांचे हातपाय बांधून लोखंडे यांना काठीने मारहाण केली. व कत्ती चा धाक दाखवत त्यांना व त्यांच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणामध्ये आरोपी सुरेश लोखंडे, पोपट लोखंडे, बापू लोखंडे, शिवाजी लोखंडे, विष्णू लोखंडे, सर्व रा.आरुळे वस्ती, जामखेड यांच्या विरोधात शिरूर कासार पोलिस ठाण्यात गुरन. 244/2025 कलम 140(3), 127(2), 118(1), 189(1), 190, 115(2), 352, 351(2), 351(2) बी एन एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर चे पोलीस करत आहेत.





