
वीज वितरण महासंघाचे धरणे आंदोलन
परळी वैजनाथ,(रिपोर्टर)ः- परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे नवीन थर्मल भागात संच क्रमांक 9 लवकरात लवकर सुरू करावे या व इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी महासंघाच्या वतीने परळी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
वीज निर्मिती केंद्राच्या प्रशासकीय कार्यालयासमोर दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी महासंघाच्या वतीने सकाळी 11 वाजता या धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. नवीन थर्मल परिसरात संच क्रमांक नऊ साठी जमीन ताब्यात घेण्यात आलेली आहे या जमिनीवर लवकरात लवकर संच क्रमांक नऊ चे बांधकाम सुरू करण्यात यावे यामुळे परिसरातील हजारावर तरुणांना रोजगार मिळणार आहे याबरोबरच सध्या कार्यरत असलेल्या वीज निर्मिती संचात कर्मचार्यांचे कपात न करता व कमी कर्मचार्यावर काम करून न घेता कर्मचार्यांना इतरत्र बदली न करता काम करण्यात येऊ द्यावी तसेच कमी असलेल्या कर्मचार्यांची जागा भरण्यात याव्यात आधी मागण्यासाठी हे धरणे करण्यात आली.
या धरणे आंदोलनास परळी वीज निर्मिती कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्यासह आंदोलनास तालुक्यामधील अनेक ग्रामपंचायतीने पाठिंबा दर्शवला यामध्ये दाऊतपुर, परळी वकील संघ, परळी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, विविध व्यापारी महासंघ, ग्रामपंचायत नागापूर, तळेगाव, वडगाव दादाहरी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समिती, राष्ट्रीय वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था, ए व्ही के के गॅस एजन्सी, ग्रामपंचायत जिरेवाडी संगम, सेलू ,नंदनंज, लोणी, परळी पत्रकार संघ,डॉक्टर असोसिएशन परळी यासह अनेक संघटनांनी यावेळी पाठिंबा दर्शविला.
सदरील आंदोलन हे जन आंदोलनात रूपांतरित होण्यासाठी सर्वांनी साथ सहयोग द्यावा आणि रानबा गायकवाड वैजनाथ चाटे मुरलीधर मुंडे यांनी यावेळी सांगितले.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्याचे वीज कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






