आर्थिक अडचणीमुळे मुंबईला जाता आलं नाही म्हणून तरुण होता नैराश्येत
बीड (रिपोर्टर): मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्ध मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्टपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आर्थिक विवंचनेमुळे जाता येत नसल्यामुळे एक तरुण विषारी औषध पिला होता. उपचारा दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या निधनाने आहेरवडगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे आमरण उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. आरक्षणाचा प्रश्न कधी मार्गी लागेल, मुंबईला जाण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती नसल्याने नैराश्येत असलेल्या आहेरवडगाव येथील भरत यादव खरसाडे (वय 22 वर्षे) या तरुणाने 27 ऑगस्ट रोजी विषारी प्राशन केल्याने त्याला उपचारार्थ बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरक्षणासाठी गेल्या तीन दिवसांमध्ये आज हा तिसरा बळी आहे.






