
पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर)ः- तुझ्या वडिलांकडून घर बांधण्यासाठी दहा लाख रूपये घेवून ये असे म्हणत विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला सतत मारहाण केली जात असल्याने या त्रासाला कंटाळून महिलेने विषारी औषध पेवून आत्महत्या केल्याची घटना शिरूर तालुक्यातील बावी येथे घडली आहे.
करिश्मा सचिन सांगळे या महिलेने 27 ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले होते. तिला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा 28 ऑगस्टच्या रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी शिवदत्त विठ्ठल पंडित यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन सांगळे (नवरा) अरूणा सांगळे, भगवान राऊत, तुकाराम राऊत या चौघांजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माहेरून दहा लाख रूपये आणत नसल्याच्या कारणावरून महिलेचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली.






