
नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
बीड (रिपोर्टर): गेल्या चार दिवसांपासून मांजरा धरणाच्या दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता मात्र पाण्याची आवक वाढल्याने आज या धरणाचे चार दरवाजे आणखी उघडून मांजरा नदी पात्रात 0.25 मि.ने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मांजरा नदीला कधीही पूर येऊ शकतो म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज दुपारी दीड वाजता मांजरा धरणाचे गेट क्र. 1, 3,4 आणि 6 उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यातून 3 हजार 494 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून 0.25 मिटराने मांजरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या सोनीसांगवी, सुर्डी व इतर जवळपास 32 गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मांजरा धरण पाठोपाठ वडवणी तालुक्यातील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले असून या धरणातून 1683 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.






