
एक कामगार ठार, एक जखमी
केज, (रिपोर्टर)ः- बांधकामाच्या कामाला जात असतांना एक मोटारसायकल स्वारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने यामध्ये एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी केज येथील सांगवी येथे घडली आहे.
गफ्फार गझम शेख (रा.परळी) व राजुराम बाळसकर हे दोघे बरड फाटा या ठिकाणी बांधकामाच्या कामासाठी मोटार सायकलवर जात होते. सांगवी जवळ त्यांच्या मोटार सायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्या अपघातात गफ्फार गझम शेख हे गंभीररित्या जखमी होवून ठार झाले तर राजुराम बाळसकर हे जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.







