परिक्षा सेंटरवरचा व्हिडिओ पत्रकारांच्या हाती लागला
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी येथे टाईपिंगच्या परिक्षा केंद्रावरचा अनगोंदी कारभाराचे दररोज यान त्या कारण चव्हाट्यावर येऊ लागले आसतानाच चक्क बाहेरचा विद्यार्थी परिक्षा केंद्राच्या हाँलमध्ये येऊन परिक्षार्थीचा पेपर देवू लागल्याचा व्हिडिओ पत्रकारांच्या हाती लागला असून याबाबत प्रशासन देखील अन्नभिन्न झाले कि आर्थिक व्यूरचना आखत याकडे दुर्लक्षित जाणूनबुजून केले जात आहे.याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषेद पुणे यांच्या वतीने टाईपिंग परिक्षार्थी विद्यार्थ्याना शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा द्यावी लागत असून ती सध्या वडवणी येथील बन्शीधर इग्लिंश स्कुल याठिकाणी सुरु आहे.याठिकाणचे सेंटर चक्क कुलूप बंद करुन आतमध्ये बाहेरचे विद्यार्थी बोलावून परिक्षार्थीच्या जागेवर बसवून परिक्षा देत असल्याचा प्रकार घडत आहे.तर याठिकाणी पत्रकारांनी दि.10 आँगस्ट रोजी व्हिजीट दिल्यानंतर सेंटर कुलूप बंद दिसून आले आहे.तर आतमध्ये सर्व अलबेल होत असल्याचा प्रकार दिसून येत टाईपिंग इन्सटिट्युड चालक सह बाहेरचे सराव करणारे विद्यार्थी याठिकाणी आढळून आले आहेत.याबाबत कुलूप लावणारे आणि कुलूप उघडणारे देखील खाजगी लोक असल्याचे दिसून आले असल्याने परिक्षा आतमध्ये सरांश सावळा गोंधळ असल्याचा धक्कादयाक प्रकार दिसून आला असून हा सर्व प्रकार संस्थाचालक आणि परिक्षा केंद्र प्रमुख यांच्या संगणमतावर सुरु असल्याच दिसून येत असल्याने यावर कुठल्याच वरिष्ठ आधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्यामुळेच हा प्रकार घडत नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.तर परिक्षा ह्या निपक्षपातीपणे होत असल्यास सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप का लावले जाते? पत्रकारांना प्रवेश का दिला जात नाही ? सदरील संस्थाचालकांना थेट परीक्षा हाँलमध्ये बसवून परिक्षार्थीचा पेपर सोडविण्यासाठी कोण परवानगी देत आहे?यासह अन्य प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला परिक्षा केंद्र चालक हेच जबाबदार असून अशा आधिकाऱ्याला वेळीच वरिष्ठांनी वेसन घालणे गरजेचे आहे.या सारांश कारभारामुळे शिक्षण विभागाचा कारभार वेशीला तर टांगला नाही ना? असा प्रश्न उपस्थित राहात आहे तर याबाबतचा व्हिडिओ देखील पत्रकारांच्या हाती लागला असून यामध्ये चक्क परिक्षा केंद्रातील विद्यार्थी परिक्षा संपण्या अगोदर बाहेर येत म्हणत आहे.माझी परिक्षा नव्हती परंतू परिक्षा द्यायला आलो होतो.मी बऱ्याच जणाची परिक्षा दिली आहे असं म्हणून दुचाकीला किंक मारून बाहेरचा विद्यार्थी याठिकाणाहून निघून गेला आहे.अस घडत असेल तर परिक्षावर संशय येत असून सदरील परिक्षा ह्या आधिकारी आणि दलाला आंदण ठरतात का? आणि याला वरिष्ठ आधिकारी काहीच करत नसतील तर संपूर्ण प्रशासनाची मिलीभगत होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रिपोर्टरचा फोन आणि टोलवाटोलवीची उत्तरे
सदरील परिक्षा बाबत रिपोर्टर प्रतिनिधी यांनी परिक्षा केंद्र प्रमुख असलेले जगदिश राऊतमारे यांच्याशी संपर्क साधाला आसता कोणत्याच प्रश्नाचे उत्तरे व्यवस्थित न देता असमाधारक उत्तरे देत पत्रकार लयच फोन करत आहेत.असा प्रतिसवाल केला आहे.तर परिक्षा केंद्राच्या गेटला कूलूप का लावले जाते? पत्रकारांना प्रवेश का दिला जात नाही? असे विचारल्यावर केंद्र चालक राऊतमारे यांची मात्र बोलण्याच टाळल आहे.
माझा संबध नाही – बी.ई.ओ
सदरील परिक्षा केंद्रावर वरिष्ठ पातळीवरच्या कोणत्या आधिकाराचा वाँच आहे.हे जाणून घेण्यासाठी वडवणी येथील गट शिक्षणधिकारी बाबासाहेब उजगरे यांच्याशी संपर्क साधाला आसता म्हणाले कि,माझा याच्याशी काही संबध नाही,परिक्षा परिषेद आणि परिक्षा केंद्र प्रमुख काय ते बघतिल अशी प्रतिक्रिया देत या प्रकरणातून हात झटकले आहेत.