Monday, January 24, 2022
No menu items!
Homeक्राईमदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं! शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं

दोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं! शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं

लिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे. खेड्यातील मुलं पुणे- मुंबईत कामासाठी अथवा शिक्षणासाठी गेली तर ती नकळत आशा मार्गाकडे जातात. या रिलेशनमध्ये पडण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक असतात मात्र नवयाने लहान आणि समज नसलेले मुले- मुली शारीरिक आकर्षण निर्माण झाले की बाकी सर्व विसरत अशा रिलेशनमध्ये जातात. अशावेळी चांगल्या लाइफस्टाइलसाठी पुरेसा पैसा असणे गरजेचे असते. शिवाय कुठल्याही परिस्थितीत मानसिक तयारी असावी लागते. अनेकदा पार्टनरच्या काही नपटणार्‍या गोष्टीकडे दुर्लक्ष देखील करावे लागते. तसेच समाजाला सामोरा जाण्याची संपूर्णपणे तयारी ठेवावीच लागते. कारण जग किती जरी आधुनिक झालं असलं तरी टोकणारे आणि अशा रिलेशनला नाकारणार्‍यांची  समाजात काही कमी नाही. रिलेशनमध्ये असल्यावर पार्टनरचा कल्पना नसलेला खरा चेहरा समोर आला अन् ठराविक गोष्टी पलीकडे मुद्दे जात असल्यास किंवा विपरित परिस्थिती निर्माण होत असल्यास कुठलेल्याही वाईत मार्गाने न जाता सरळ सरळ ब्रेकअप घेणे दोघांसाठीदेखील फायद्याचे ठरते. मात्र  एकमेकांच्या खर्‍या खोट्या प्रेमात बुडालेले एकमेकांना सहजासहजी सोडत नाहीत. त्यामध्ये सर्वात जास्त महिलेला ब्लॅकमेल केलं जात तर काही वेळा महिला देखील पुरुषाला ब्लॅकमेल करतात.  अन् यातून अनेक वेळा नको त्या खुनासारख्या घटना घडतात. अशीच एक घटना गेल्या दीड महिन्यांपूर्वी दिपावलीच्या सणात लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच नेकानूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. लिव्ह- इन रिलेशन्शिपमध्ये राहणार्‍या प्रेयसी सावित्रीचा तिच्या प्रियकराने दोन वर्ष बायको सारखी सांभाळली अन् भोगली. जेव्हा ती लग्णासाठी तगादा लावू लागली तेव्हा त्याला ती डोकेदुखी वाटू लागली अन् तिच्यातील शारीरिक आकर्षण संपते तेव्हा तो तिला दूर करण्याचा प्रयत्न करतो. तिच्या एका झलक साठी रात्रंदिवस तरसणार्‍या अविनाशला ती नकोशी वाटते. तिच्या ज्या चेहर्‍यावर तो भुलून तूच माझी दुनिया म्हणत जिच्यावर शारीरिक आकर्षणापोटी प्रेम करत होता. त्याच अविनाशनेे तिचा गळा दाबून खून करत चेहर्‍यावर ऍसिड टाकून विद्रूप करण्याची वेळ का येते? दोन वर्ष रिलेशन्शिपमध्ये राहणार्‍या आणि त्यापूर्वीही तिच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या अविनाशला नेमकं हे कृत्य का कराव लागल?  काय आहेत या मागची कारण? यासाठी हि स्टोरी आज आपल्यासमोर घेऊन येत आहे.

Crime Logo copy


ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याच्यासाठी आई वडिलांना सोडून दोन वर्ष सावित्रा पुण्याला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. सर्वकाही सुरळीत होतं मात्र तिने आपण असे किती दिवस राहायचे? आता आपण लग्न करून घेऊ असे म्हणत अविनाश कडे तिने लग्नाचा तगादा लावला. मात्र अविनाश च्या मनात तिचा केवळ वापर करण्याचा हेतू असावा म्हणून तो तिला सतत टाळण्याचा प्रयत्न करायचा. तिने लग्नाचा विषय काढला की तिच्यावर राग राग करायचा ती सतत लग्नाचे टुमने माग लावत होती त्यामुळे अविनाश तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तू माझ्या परस्पर परक्या पुरुषासोबत बोलतेस असे म्हणून तिला मारहाणही करू लागला. मात्र आई-वडिलांना न सांगतात परस्पर सावित्रा अविनाश सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याने ती कोणाला काही सांगू शकत देखील नव्हती. तर दुसरीकडे ती आता अविनाशसाठी  डोके दुखी झाली होती. त्यामुळे सावित्राचा काटा काढण्याचा चंग अविनाशने मनोबन बांधला अन् नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने १४ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे तीन  च्या दरम्यान गाड झोपेत असलेल्या सावित्राचा गळा दाबून चेहरा विद्रूप करण्याच्या उद्देशाने चेहर्‍यावर ऍसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळली. आणि तो तेथून निघून गेला. पहाटे तीन वाजल्यापासून सावित्रा मांजरसुंबा नेकनुर रोडवरील उत्तर बाजूच्या ढाणे मंगल कार्यालया जवळी एका खदानीत मरण यातना भोगत होती. पहाटे तिच्यावर तीन वाजता हल्ला झाला होता. मात्र दुपारचे दोन वाजले तरी तिला कोणाची मदत मिळाली नव्हती. ती कशीबशी रस्त्यावर आली आणि बघ्यांची एकच गर्दी जमली त्या गर्दीतून एकाने नेकनुर पोलिसांना फोन करून माहिती दिली. की एक २२ वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत रोडच्या कडले मदतीची याचना करत आहे. याची माहिती नेकनुर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख लक्ष्मण केंद्रे यांना मिळतात त्यांनी आपल्या शासकीय वाहनातून घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ए.एस.आय. ढाकणे, पो. कॉ.तांदळे हे  होते. त्याच गर्दीतील एकाने तोपर्यंत ऍम्बुलन्सला फोन केला होता. माहिती मिळाल्याच्या अवघ्या सात मिनिटात केंद्रे  घटनास्थळी दाखल झाले. ऍम्बुलन्सला येण्यासाठी वेळ असल्याने केंद्रे यांनी अधिकचा वेळ न घालवता त्या पिडीतेला तत्काळ स्वतःच्या शासकीय वाहनात टाकून बीडच्या दिशेने धाव घेतली. समोरून ऍम्बुलन्स येणार होती. त्यामुळे चालकाला कॉल करून केंद्रे यांनी आम्ही घेऊन येत असल्याचे सांगितले. त्यानंतर नेकनूर जवळ आल्यावर अँम्बुलन्स आल्याने पिडितेला तत्काळ    अँम्बुलन्समध्ये टाकून केंद्रे त्यांच्या मागे जिल्हारुग्णालयात गेले. तिला तात्काळ बर्न वार्ड मध्ये दाखल करण्यात आले. आणि केंद्रे यांनी जवाब नोंदवून घेतला. त्यामध्ये सावित्रा दिगंबर अंकुलवार (व्यवसाय घरकाम रा. शेळगाव ता. देगलुर जि. नांदेड) या पिडितेने नेकनूर पोलिसांसमोर जवाब दिला की, गेल्या दोन वर्षापासून स्वतःच्या मर्जीने घरी कोणाला काही न सांगता ती पुणे येथे राहात होती. मागील एक वर्षापासून तिच्याच गावातील म्हणजे शेळगाव येथील अविनाश रामकिसन राजुरे (वय पंचवीस वर्ष) त्याच्यासोबत पुणे जवळील शिरूर येथे राहत होते. अविनाश राजुरे हा तेथीलच एका हायर कंपनी मध्ये कामाला होता. दिनांक १३ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२ वा. अविनाश आणि सवित्रा दोघेजण मोटरसायकलवर फिरण्यासाठी पुण्याहून निघाले होते. ते मांजरसुंभा- केज कडे जाणार्‍या रोडवर जात असतांना रात्र झाल्याने नऊ वाजता येळंबघाटच्या पुढे ढाणे मंगल कार्यालयाच्या जवळील एका खदानी मध्ये झोपले होते. १४ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे अंदाजे तीन वाजता अविनाश राजुरे याने अचानक सावित्राचा गळा दाबला आणि अंगावर- तोंडावर- छातीवर- हातावर पेट्रोल वर ऍसिड टाकून आग लावली व तिला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला आणि तेथेच सोडून निघून गेला अशी आपबिती सावित्राने पोलिसांसमोर सांगितल्याने आरोपी अविनाश विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी केज विभागाचे डीवायएसपी भास्कर सावंत यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. आणि यातील आरोपी अविनाशला पकडण्यासाठी पावले उचलली. अन् देगलुर पोलिसांना घटनेची माहिती दिली. कारण अविनाश आणि सावित्राचे गाव हे देगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. घटनेच्या दुसर्‍या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी मृत्यू यातना भोगत असलेल्या सावित्रा ने जगाचा निरोप घेतला. एकीकडे दगडाच्या लक्ष्मीची पूजा होत असताना दुसरीकडे जिवंत सावित्रीला ऍसिड टाकून जाळल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. तिचा यातच दुर्दैवी अंतही झाला होता. मात्र तरीदेखील आरोपी मोकाट असल्याने त्याला अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

pan 6

त्यानंतर पोलिसांनी दाखल गुन्ह्यात सावित्रा मयत झाल्याने कलम वाढवून २५७ / २०२० कलम ३०२, ३०७ ,३२६ (अ), २०१, भादवी आरोपी अविनाश  राजुरे विरोधात गुन्हा दाखल केला. आणि आरोपीच्या शोधासाठी भास्कर सावंत यांनी तात्काळ पावले उचलेले.  अविनाश रामकिसन राजुरे (रा. शेळगाव ता. देगलुर जि.नांदेड) याला देगलूर पोलीसांनी दि. १६ नोव्हेंबर २०२० रोजी देगलूर अटक केली. याची माहिती नेकनूर पोलिसांना दिली त्यानंतर  डीवायएसपी भास्कर सावंत आणि नेकानूर पोलिस ठाण्याचे ठाणे प्रमुख लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काळे, ए. एस. आय. ढाकणे, आणि वाघमारे यांची टीम देगलूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आणि आरोपीला घेऊन नेकनूरला आली.  त्यानंतर आरोपी अविनाशला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला १४ दिवसाची पोलीस कस्टडी म्हणजेच २९ नोव्हेंबर पर्यंत सुनावण्यात आली. आणि या घटनेचा तपास डीवायएसपी भास्कर सावंत यांनी करत घटनेची उकल केली.अविनाश रामकिसन राजुरे हा मुळचा राहणार शेळगाव तालुका देगलुर जिल्हा नांदेड चा आहे मात्र कामाच्या उद्देशाने पुणे तालुका शिरूर येथे कामासाठी गेला होता. तो हायर अप्लायसेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (प्लॉट फेज टू रांजणगाव एमआयडीसी)  येथे अभियंता म्हणून मागील दीड वर्षापासून कार्यरत होता. तो पुणे येथील गंगा फेज 01 बाबुराव नगर घोडनदी शिरूर येथे राहत होता. त्याला त्या कंपनीत २२ हजार रुपये महिना होता. अविनाश गावातील दिगंबर अंकुलवार यांची मुलगी सावित्रा दिगंबर अंकुलवार तिच्यावर गेल्या सहा वर्षापासून प्रेम करत होता. त्यांचे प्रेम शारीरिक संबंधापर्यंत गेले होते. त्यावेळेस सावित्रा ही अविनाशला म्हणायची आपण लग्न करू परंतु अविनाशच्या घरचे आई- वडील या लग्नाला तयार नव्हते. त्यांचा विरोध असल्याने आपल्याला लग्न करता येणार नाही असे त्याने सावित्रीला सांगितले होते. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये सावित्राचा वडलांनी आंध्र प्रदेश येथील मलाकापूर जिल्ह्यातील एका मुलाशी विवाह लावून दिला. मात्र सावित्रा अविनाश वर जीवापाड प्रेम करत होती. तिने अविनाश जीवनसाथी मानला होता. त्यामुळे ते वडिलांनी लग्न करून दिले म्हणून केवळ एक महिना तिच्या नवर्‍यासोबत राहिली आणि नंतर गावाकडे म्हणजेच माहेरी निघून आली आणि अविनाश ला फोन करून म्हणू लागले की मला तुझ्या सोबत संसार करायचा आहे मी पुण्याला येते. मात्र त्यावेळेस अविनाश तिची समजूत काढत होता. तू तुझ्या नवर्‍याकडे नांदायला जा असा तो तिला म्हणायचा मात्र सावित्रा त्याच्या प्रेमात अखंड बुडाल्याने त्याच्यासाठी ती वेडी झाली होती. ती अविनाश ला म्हणायची तू जर मला घेऊन गेला नाहीस तर मी विषारी औषध पिऊन मरेल असे ती त्याला म्हणायची. त्यानंतर अविनाश ने तिला पुण्याला बोलावून घेतले त्याठिकाणी ते दोघे पती-पत्नी सारखे एकत्र राहत होते. त्यावेळेस अविनाश हा कंपनीत ड्युटीला जायचा आणि सावित्रा ही घर काम करायची लग्न न करता दोघेजण रिलेशनशिपमध्ये पुण्यात आनंदाने राहू लागले मात्र आपण पण न लग्न करता असे किती दिवस राहणार म्हणून गेल्या एक वर्षापासून सावित्रा अविनाशला म्हणायची आता आपण लग्न करून घेऊ या असे किती दिवस जगायचे म्हणून सावित्रा कोर्ट मॅरेज करू म्हणून अविनाशला तगादा लावायची. मात्र त्यावेळेस सावित्राकडे आधार कार्ड नाही अशी अडचण सांगून अविनाश ने तिला लग्नाला टाळले. सावित्रा अविनाश कडे राहते हे अविनाशच्या घरच्यांना माहीत नव्हते. मात्र तिच्या वडिलांना ते माहीत होते. अविनाशला कधी रात्र तर कधी दिवसा कंपनीत जावे लागायचे. अविनाशकडे गावाकडील नातेवाईक पुण्याला आले तर अविनाश त्यांना मित्राची रूम दाखवायचा. आणि त्याच रूमवर मी राहतोय म्हणून तेथे घेऊन जायचा. अविनाश तेव्हापासून कंपनीत नोकरीला लागला तेव्हापासून तो गावाकडे आई-वडिलांना पैसे पाठवायचा परंतु सावित्रा आणि ते एकत्र रहात असल्याने खर्च वाढला त्यामुळे अविनाश रात्री अथवा दिवसा ड्युटी संपल्यानंतर थोडा आराम करून नंतर खेड्या ला जाऊन पॉपकॉर्न विकायचा त्यातून त्याला पंधरा हजार रुपये महिना मिळायचा. त्यादरम्यान अविनाशने सावित्रीला मोबाईल घेऊन दिला मात्र तोच मोबाईल दोघांच्या आयुष्यात तेढ निर्माण करणारा ठरला. सावित्रा मोबाईल वरून कोणालातरी बोलते असा अविनाशला संशय आल्याने तो तिच्यावर संशय घेऊनलागला. तिच्याकडे अजून एक मोबाईल असल्याचा आरोप कराचा. एके दिवशी त्याने घरातच झोपेचे नाटक केले त्यावेळेस ती कोणालातरी फोनवर बोलत होती ती एका पुरुषालाच बोलत असल्याचा अंदाज काढतात तो सावित्राच्या जवळ गेला, मात्र त्यावेळेस सावित्रा ने आलेला फोन कट करून मोबाईल मधील नंबर डिलीट केला. त्यावेळेस अविनाश ने सावित्रा ला बेदम मारहाण केली.  त्यांनतर सावित्रा त्याला म्हणाली मला आत्ताची आता बाळ पाहिजे त्यावेळेस अविनाश सावित्राला म्हणू लागला आपण माझ्या घरी सांगू त्या नंतर बघू असे म्हणायचा मात्र त्याच्या वडिलाला घरी कळले तर ते दुसर्‍या मुलीचे लग्न लावून देतील म्हणून सावित्रा अविनाश च्या घरी सांगून देत नव्हती. गेल्या दीड महिन्यापूर्वी अविनाशने ओएलएक्स वरून पुणे येथील कदम नामक व्यक्तीची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल (क्र. एम. एच. १२-३६ ९७) ही १७ हजार रुपयाला खरेदी केली होती. दरवर्षी अविनाश हा दिवाळीला गावी जात होता. दि. १३ नोव्हेंबर २०२० रोजी कंपनीला दीपावलीच्या सुट्‌ट्या लागणार होत्या याची माहिती अविनाशला दोन दिवसांपूर्वी झाली होती. त्यामुळे अविनाश हा सावित्राला म्हटला मी दीपावलीनिमित्त गावी जाऊन येतो तू इथे थांब असे म्हणून नंतर सावित्रा म्हणाली तू सुद्धा गावी जाऊ नको म्हणून त्याला तिने विरोध केला. त्यावेळेस मित्र म्हणायचे आपण बाहेर फिरायला जाऊ अविनाश ने तिला विरोध केला आणि अविनाश म्हनाला आपल्या दोघातील संबंध मला माझ्या घरच्यांना सांगू दे. मी आई-वडिलांचे मन वळवून त्यांना आपल्या दोघांचे लग्नासाठी विनंती करतो. मात्र गावाकडे जाण्यास सावित्रीने विरोध केला आणि दोन दिवस दोघांचेही कडाक्याचे भांडण झाले दोन वर्ष दोघं आनंदाने राहत होते मात्र अविनाश ने तिला मोबाईल घेऊन दिला आणि कोणाला तरी फोनवर बोलते म्हणून अविनाश चा त्याच्यावर संशय बळावला आणि तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यातच सावित्रा अविनाश ला गावाकड जाण्यापासून रोखतो होती आणि त्यांच्या दोघातील संबंध घरच्यांना सांगण्यासही विरोध करते, यामुळे अविनाशच्या मनात तिच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला आणि अविनाश ने तिचा काटा काढायचा निर्णय घेतला.तिचा काटा काढल्यावरच आपण या कटकटीतून मुक्त होईल असे अविनाशला वाटू लागले.दिनांक १२ ११ २०१९ रोजी अविनाश सावित्रीला गोड बोलून आपण परळी मार्गे औंढा नागनाथ येथे फिरायला जाऊ असे सांगितले आणि रस्त्यामध्येच हीचा काटा काढण्याचा प्लॅन केला. त्यानुसार दिनांक १२ ११ 2020 रोजी रात्री ड्युटी करून दिनांक १३ ११ २०२० रोजी सकाळी अविनाश कंपनीतून घरी आला रात्री ड्युटीला जाताना तिला अविनाशने तयारी करून बॅग वगैरे भरून ठेवायला सांगितले होते. अविनाश घरी आल्यानंतर फ्रेश होऊन आंघोळ केली तिने बॅग वगैरे भरून ठेवली होती. त्यावेळेस अविनाश ने तिची नजर चुकवून घरातील काडी पेटी व घर मालकाकडून सावित्रा ने फरशी पुसण्यासाठी आणलेल्या ऍसिड ची बाटली अविनाशने त्याच्या सोबत सावित्राची नजर चुकून कपड्याच्या खाली लपवून ठेवली त्याच दिवशी दुपारी बारा वाजता ते दोघेजण त्यांच्या मोटरसायकलवरून शिरूर येथील घरून फिरायला निघाले. त्यावेळेस अविनाश कडे १ व्हील बॅग व एक शाक होती. अविनाश ने रस्त्यामध्ये सुप्या जवळ डाव्या हाताला एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये जास्तीचे पेट्रोल भरले. सुपा तोल नाका मार्गे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अहमदनगर येथे गेले. सावित्रा  म्हणाली मला साडी आणि परकर मुळे मोटारसायकलवर बसण्यास त्रास होत आहे म्हणून दोघांनी अहमदनगर येथील बाजारात एका गाड्यावर पंजाबी ड्रेस खरेदी केला. व नगर हून हे दोघे बीड कडे निघाले. साडेपाच वाजण्याच्या सुमारास बीड कडे येत असताना रस्त्यात एका ठिकाणी डोंगरामध्ये सोबत आणलेला डबा खाल्ला याठिकाणी रस्त्याच्या बाजूला जाऊन सावित्राने अंगावरील साडी आणि परकर काढून पंजाबी ड्रेस घातला त्या दोघांनी त्या ठिकाणी थोडा आराम केला आणि अमळनेर मार्गे बीडला आले.बीड वरून मांजरसुंबा मार्गे अंबाजोगाई कडे निघाले साधारणता साडेआठ वाजण्याच्या सुमारास अविनाशला वडिलांचा फोन आला आणि तो त्यांच्याशी फोनवर बोलला. रोजच्यापेक्षा आज अविनाश सावित्राला जरा जास्त प्रमाणात बोलत होता तिला त्याने नवीन ड्रेस घेतला होता तो वरून जेवढ प्रेम दाखवत होता त्याच्या कैक पटीने आत मध्ये काळ बेर शिजत होतं. तो सावित्राचा काटा काढण्यासाठी अंधार होण्याची वाट पाहत होता. अंधार पडल्याने नऊ वाजण्याच्या सुमारास नेकनूरच्या पुढे एका मंगल कार्यालयाच्या जवळ झोप येत असल्याचा बहाणा त्याने केला आणि येथेच मुक्काम करू अन सकाळी जाऊ असे म्हटल्याने सावित्रीनेही होकार दिला त्यानंतर दोघे रोडच्या कडेला उत्तर बाजूस मोटरसायकल घेऊन त्याठिकाणी झोपी गेले. ते दोघे रोडच्या कडेला झोपल्यामुळे वाहनांच्या आवाजाने त्यांना झोप येत नव्हती त्यामुळे तेथून जवळच असलेल्या खदाणी जवळ जाऊन  झोपी गेले मात्र झोपताना अविनाश च्या मनात तिचा काटा आणायचा हा विचार घोंगावत होता. मात्र  रात्री कंपनीमध्ये रात्रपाळीत ड्युटी करून आल्याने सावित्रा झोपण्याच्या अगोदरच अविनाश ला झोप लागली.  दिनांक १४ ११ २०२० रोजी पहाटे अविनाश ला तीन वाजता जाग आली आणि सावित्रा तेव्हा गाढ झोपेत होती तेव्हा त्याने त्याच्या मोटरसायकल मधील पेट्रोल एका बिसलेरीच्या रिकाम्या बाटलीत काढून घेतले सोबत आलेली ऍसिड ची बाटली आणि काड्याची पेटी ही काढून जवळ ठेवली आणि सावित्रीचा पुर्ण ताकत लावून गळा आवळला तिने त्याला विरोध करत हात पाय हलवले मात्र काही वेळातच ती शांतपणे पडली आणि अविनाशने तिची ओळख पटू नये म्हणून त्याने तिच्या तोंडावर एडिस व पेट्रोल टाकून काडी लावून दोन्ही बॅगा घेऊन मोटरसायकलवर अंबाजोगाई कडे निघाला. त्यावेळेस आरोपी अविनाश घाबरला होता. गाडी चालवताना हात थरथर कापत होते थोडासा अंधार होता. अविनाश ने बॅगमधील तिची साडी ब्लाउज परकर रोडच्या कडेला जाळून टाकला. येथून मोटरसायकल चालू करून केज अंबाजोगाई मार्गे अहमदपूरला गेला. त्याच्या मोटारसायकल मधील पेट्रोल कमी झाल्याने अहमदपूर मध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले आणि अहमदपूर च्या पुढे अंदाजे दहा किलोमीटरवर एका हॉटेलच्या समोर रोडच्या डाव्याबाजूला अंदाजे आठ वाजण्याच्या सुमारास पडीक जमिनीत सावित्राचे राहिलेले कपडे सर्व पेटवून दिले. तिच्या मोबाईल मधील सिम कार्ड जाळले. फक्त तिच्या पर्समधील मोबाईल सोबत घेऊन तो मुखेड व तिथून मधल्या मार्गे शेळगाव येथे दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचला. घरी गेल्या नंतर दोन वाजण्याच्या सुमारास टीव्हीवर बातम्या पहात असतांना सावित्रीची बातमी आली आणि ती पाहून तो पाहुण्याकडे निघून गेला. इकडे मात्र सावित्रा जळालेल्या अवस्थेत असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांच्या मार्गदर्शनाखाली केजचे डीवायएसपी भास्कर सावंत यांनी केला. त्यांना नेकनूर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख लक्ष्मण केंद्रे, पोलीस ठाण्यातील पीएसआय जाधव, काळे यांच्यासह ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल तांदळे, तर केज डिव्हिजनचे संजय राठोड, विकास चोपणे, महादेव सातपुते, नितीन चौरे, यांचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!