
दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल
परळी, (रिपोर्टर)ः- परळी शहरातील इरानी गल्ली भागात पोलिसांनी 53 किलो गांजा जप्त केला आहे. गांजासह इतर साहित्य असा एकूण 12 लाख 23 हजार 680 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील इराणी गल्लीमध्ये गांजा असल्याची माहिती परळी पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून छापा मारला. यामध्ये 53 किलो 134 ग्राम गांजा व गांजा विक्री करण्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल असा एकूण 12 लाख 23 हजार 680 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भाऊसाहेब व्यंकटराव सौदनकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी वसील उर्फ शराबी अकरम बेग व अकरम रफिक बेग (रा.इराणी गल्ली शिवाजी नगर,परळी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत









