’

वडीगोद्री (रिपोर्टर):- मी जरी अशिक्षित असलो तरी तुम्हाला रडकुंडीला आणले. तुला मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नव्हते, पण त्या विचारांवर मी पाणी फिरवले, अशा शब्दांत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ’अशिक्षित’ टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
अंकुशनगर येथील निवासस्थानी त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
जरांगे पाटील म्हणाले, मी अशिक्षित असताना जर तुम्हाला रडकुंडीला आणले, तर आमचे सुशिक्षित लोक बोलायला लागले तर तुझे काय होईल याचा विचार कर. भुजबळांना हे चांगलेच माहीत आहे की, मी अशिक्षित आहे की सुशिक्षित. मी जीआर काढला तरी त्यांना सुधारता येत नाही, ते पूर्णपणे पागल झाले आहेत, असा पलटवारही जरांगे यांनी केला.








