
पुजा वाघ नावाचे फेसबूक अकाऊंट चालवणार्याविरोधात गुन्हा दाखल
वडवणी (रिपोर्टर): ऊसाच्या बिलासंदर्भात एका व्यक्तीने पोस्ट टाकल्यानंतर त्यामध्ये अनेकांनी कमेंट केल्या. त्यातील फेक कमेंट ना.पंकजा मुंडे यांच्या बाबतीत बदनामीकारक आढळून आल्याने सदरील कमेंट टाकणार्या विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऊसाच्या बिलासंदर्भात सुरेशदादा भोरे यांनी फेसबूकवर पोस्ट टाकली होती, भोरे यांनी वैद्यनाथ कारखान्याने बिल तात्काळ द्यावे अशी मागणी पोस्टद्वारे केली होती. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या, त्यातील पुजा वाघ नावाचे फेसबूक अकाऊंट चालवणार्या व्यक्तीने ना.पंकजाताई मुंडे यांच्याबाबतीत वाईट कमेंट टाकली, सदरील हा प्रकार संजय केशव आंधळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पुजा वाघ नावाने अकाऊंट चालवणार्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








