
बीड, (रिपोर्टर)ः- कुणबीची नोंद सापडत नसल्याने नैराश्येत जावून एका 40 वर्षीय तरूणाने विषारी औषध पेवून आत्महत्या केल्याची घटना आहेर धानोरा येथे घडली आहे. मराठा आरक्षणासाठी गावातील ही दुसरी आत्महत्येची घटना आहे.
मराठाआरक्षणासाठी आज पर्यंत राज्यातील अनेक तरूणांनी आत्महत्या केल्या आहेत. हे आत्महत्येचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. आहेर धानोरा येथील संतोष अर्जुन वळे (वय 40) यांची कुणबीची नोंद सापडत नसल्याने ते नैराश्यत राहत असे. या नैराश्येतून त्यांनी 2 सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. गावातील ही दुसरी आत्महत्या आहे. वळे यांच्या पश्चात दोन मुलांसह इतर परिवार आहे.








