
बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाचे नेते महंमद इलियास उर्फ ईलियास टेलर यांनी काल काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोक पाटील व जिल्हाद्यक्ष राहूल सोनवणे यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रवेश केला.
महंमद ईलियस यांनी न.प. निवडणूक लढवली. यात विजयी हाते न.प. सभापतीपदी वर्णी लागली होती. स्थानिक पातळीवर त्यांनी आपली वेगळी चाप निर्माण केली होती. अल्पसंख्यांक बांधवांच्या न्याय व हक्कासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी आता काँग्रेस पक्षात प्रवेा केला आहे. देशाचे नेते खा. राहूल गांधी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. रजनीताई पाटील यांचे हात बळकट करण्याकरीता जिल्हाध्यक्ष राहूल सोनवणे, युवा नेते आदित्य पाटील यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ईलियास टेलर सह मुशरफ शेख, शेख साद, सोफियान इलियास शाह यांच्यासह शहरातील त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस प्रवेश केला या वेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कुमार शेप, बीड तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे, डॉ. चाळक यांच्यासह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.







