
नेकनूर, (रिपोर्टर)ः- गेल्या तीन ते चार दिवसापासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नेकनूर येथील बसस्टॅण्डच्या मागील कॉलनीत नागरीकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरीकांची मोठी तारांबळ उडत आहे. ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभारामुळे या भागातील, कॉलनीतील ही दुरावस्था होत असल्याचे नागरीकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. ग्रा.पं. ने वेळीच याची दखल घेत या ठिकाणचे पाणी इतर ठिकाणी काढून द्यावे अशी मागणी केली जात आहे.
नेकनूर ग्रा.पं. अंतर्गत अनेक भागात विकास कामे झालेली नाहीत. नाल्या, रस्त्याची कामे होत नसल्याने नागरीकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कित्येक नागरीकांच्या घरात पाणी घुसले. नेकनूर येथील बसस्टॅण्डच्या पाठी मागे असलेल्या कॉलनीत सर्वत्र पाणीच पाणी झाले. नागरीकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. ग्रा.पं.ने या ठिकाणचे पाणी इतर ठिकाणी काढून दिले असते तर लोकांचे हाल झाले नसते. ग्रा.पं.च्या अनागोंदी कारभारामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.







