
दोन आरोपी जेरबंद
केज (रिपोर्टर): मस्साजोग येथे एका टेम्पोतून गुटखा आल्याची माहिती एलसीबीला झाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून 34 लाख 46 हजार 227 रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मस्साजोग या ठिकाणी एका टेम्पोद्वारे गुटखा आणण्यात आला. याची गुप्त माहिती एलसीबी विभागाला झाल्यानंतर पोलिसांनी रात्री त्याठिकाणी कारवाई केली. टेम्पोमध्ये 34 लाख 46 हजार 227 रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी रोहीत आसाराम देशमुख (वय 35 वर्षे, रा. मस्साजोग ता. केज) व साहेबराव लिंबा आंधळे (वय 45 वर्षे, रा. आठधळ्याची वाडी ता. केज) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, आनंत मस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, अंकुश वरपे, राहूल शिंदे, अशफाक सय्यद, मनोज परझने, नितीन वडमारे, सिद्धार्थ मांजरे, सुनील राठोह यांनी केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.








