• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मराठ्यांनी शासक आणि प्रशासक दोन्ही बनलं पाहिजे-मनोज जरांगे पाटील

by गणेश सावंत
October 3, 2025
Reading Time: 4 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याला उत्स्फूर्तपणे मराठा समाजाने हजेरी लावून दसरा मेळावा न भूतो न भविष्यती केला. कुठलाही गाजावाजा न करता आयोजीत केलेल्या या मेळाव्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्याने जो तो आपल्या तोंडात बोट घालत असल्याच्या प्रतिक्रिया एकीकडे व्यक्त होत असताना दुसरीकडे आरक्षण मिळूनही आता थांबायचं नाही, शासन-प्रशासनात आपले टक्के वाढवायचे आहेत. मराठ्यांनी शासक आणि प्रशासक दोन्ही बनले पाहिजे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी ‘मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, पण लेकरांना आरक्षण मिळाल्याचे पहायचे आहे’, असे सांगत अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले आहे  त्यांना हेक्टरी 70 हजार रुपये द्या, एक महिन्याच्या आत शेतकर्‍यांना मदत द्या, नसता शेतकर्‍यांसाठी आंदोलन उभारू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरून दिला. त्याचबरोबर पिचलेल्या शेतकर्‍यांना मदत करताना कोणाची जात बघू नका, त्यांना काही ना काही मदत करा, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी या वेळी केले.  


आपल्या भाषणात जरांगे पाटील भावूक झाले. ते म्हणाले – मी आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना आरक्षण मिळालेलं मी बघणार. पण मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. त्यामुळे एकजुटीने राहा. ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे.
ते पुढे म्हणाले की, हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर लागू झाल्यानंतर अख्खा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी संघर्ष करून एक कोटी लोकांना आरक्षणात घातले आहे. उरलेल्यांना देखील त्यांचा हक्क मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत
जरांगे पाटलांनी काही राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले – आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत. हे लोक फक्त टीव्हीवर बोलतात, मोठ्या गाड्यांत फिरतात. पण 40 वर्षांत समाजाला काही दिलं नाही. उलट आपल्यातूनच काही गद्दार पुढे आले.
ते पुढे म्हणाले की, आपल्या जातीचं खरं काम प्रशासनातले अधिकारीच करून दाखवतात. सत्ता असो वा नसो, अधिकारी असेल तर खुटा ठोकून ठेवतो. म्हणून आता मराठा समाजाने आपल्या मुला-मुलींना अधिकारी बनवलं पाहिजे.

शासक आणि प्रशासक दोन्ही बना
जरांगे पाटलांनी प्रशासनाच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले – प्रशासनात एवढी ताकद आहे की, मोठा नेता असला, गुंड असला तरी त्याला प्रशासनासमोर हात जोडावे लागतात. त्यामुळे मराठ्यांनी अधिकारी बनलं पाहिजे. त्याचबरोबर शासकही बनलं पाहिजे. समाजाला दारिद्र्याचा गंज काढायचा असेल, जातीला संभाळायचं असेल, तर आपण शासक-प्रशासक दोन्ही बनायला हवं.

टंगळमंगळ बंद करा, चतुर व्हा
भविष्यातील लढ्यासाठी त्यांनी समाजाला सजग राहण्याचे आवाहन केले. मी आणि माझ्या समाजाने सरकारच्या मुंडक्यावर पाय ठेवून थोडं थोडं मिळवलं आहे. आता पुढे टंगळमंगळ बंद केली पाहिजे. चतुर राहून, डोकं लावून मराठ्यांनी शासक आणि प्रशासक बनलं पाहिजे, असे ते म्हणाले.

या मेळाव्यात जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून मराठा समाजाच्या आगामी वाटचालीचा स्पष्ट आराखडा मांडला – आरक्षण मिळालंय, आता प्रशासनात वर्चस्व मिळवायचं आहे.

पॉईंट टू पॉईंट जरांगे पाटील
मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर आम्हाला गुलाम म्हणता, गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता, मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का? असा परखड सवाल मनोज जरांगे (चरपेक्ष गरीरपसश) यांनी विचारला. आमच्या पोराबाळांचा पाणउतार करण्यासाठी, जातीता अपमान करण्यासाठी यांना 30 वर्षे निवडून दिले का? असा प्रश्न विचारत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांना टोला लगावला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मुंडे बंधूंवर टीका केली.


आपल्याला गुलाम म्हणणार्‍यांसाठी काम कशाला करता?
राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत मनोज जरांगे यांनी त्यावर टीका केली. ते म्हणाले की, त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅझेट आहे. मी त्यांना काहीही बोललो नाही. मी बोलायला सुरू केलं तर काय होईल. लोकाच्या लेकराबाळाला तुच्छ समजू नका. गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता, आमच्या लेकांना गुलाम समजता काय? अशा लोकांच्या सोबत काम करणारे मराठ्यांच्या पैदाशी कोण कोण आहेत? तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणाले, त्यांचा प्रचार करतो काय? पाच-दहा लाखांसाठी कशाला चाटता? आम्ही जर गुलाम आहोत तर मराठ्यांनो, त्यांच्याकडे कशाला काम करता?

: कशाला कुणाच्या पायाखाली काम करता?
आमचं गुलामीचं गॅझेट आहे तर मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का? मग इंग्रजांनी केलेल्या 1931 च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण घेतला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? आम्ही बिघडलेल्या रक्ताचं नाही. तुम्ही तिकडून अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडे निझामाची चाकरी करायला लागला असं आम्ही म्हणायचं का? पण आम्ही तसं म्हणत नाही असं मनोज जरांगे म्हणाले.

आम्ही कुणाला घाबरत नाही. माजलेल्यांना नीट करायची ताकद आमच्यात आहे. यांनी आपल्या जातीवर बरंच बोललं, आम्हाला पण सगळं बोलता येतं. पण आता मापात राहा. तुम्ही असं बोलण्यासाठीच मराठ्यांनी तीस वर्षे निवडून दिलं का? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला.

यांना निवडणुकीत खपाखप पाडा
मनोज जरांगे म्हणाले की, हे बदलणारे नाहीत. त्यामुळे दया माया जरा कमी करा. मराठ्यांच्या विरोधात जे कोण उभा राहतील त्यांना खपाखप पाडा. जेव्हा असं होईल त्यावेळी ते मराठ्यांसोबत चांगलं राहतील. तुमच्या लेकरांना गुलाम म्हटलं, मग ते तुमच्या लेकरांपेक्षा मोठे आहेत का?

ओबीसी समाजाला दोष नको
आजपासून कधीच ओबीसी समाजाला दोष द्यायचा नाही. ओबीसींची समाजाचा काही संबंध नाही. याच्यात काही नेते आहेत. सगळ्या माळी समाजाचा दोष आहे का? ते छगन भुजबळ बावचाळले आहे. त्यामुळे काही नेते यामध्ये बोलतात असं मनोज जरांगे म्हणाले.

Previous Post

पोलीस दुसर्‍याची बायको घेवून फिरता होता

Next Post

साहेब गेल्यानंतर बहिणीने मेळाव्याची परंपरा जिवंत ठेवली, याचा अभिमान – धनंजय मुंडे

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post

साहेब गेल्यानंतर बहिणीने मेळाव्याची परंपरा जिवंत ठेवली, याचा अभिमान - धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?