
महिलेच्या पतीने केला राडा, शिवाजी महाराज चौकात बघ्याची चंगळ
बीड, (रिपोर्टर)ः- आपल्या सोबत न नांदता एका पोलिसासोबत चार चाकी गाडीमध्ये पत्नी फिरतांना पाहून संतापलेल्या पतीने थेट रस्त्यावरच राडा केल्याची घटना आज दुपारी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. यामुळे काही काळ वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. बघ्यांनी तोंबा गर्दी केल्याचे पाहून घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह अन्य पोलिस पाहंचले. पोलिसांकडूनच व्याधीचार होत असल्याने या घटनेची जोरदार चर्चा होत असून राडा करणारा नवरा संबंधित महिला आणि महिलेला फिरवणारा पोलीस या तिघांना शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र नेहमीप्रमाणे शिवाजी नगरपोलिसांनी आमच्याकडे काही दाखल नाही म्हणत या घटनेवर भाष्य करणे टाळले.
याबाबत अधिक असे की, आज दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एक चारचाकी गाडी मध्ये पोलिसासह एक महिला फिरतांना महिलेच्या पतीला दिसले. सदरची गाडीचा क्रं. उपलब्ध आहे. मात्र तो या ठिकाणी आम्ही देत नाहीत. अवैध पध्दतीने त्या गाडीमध्ये पोलीस नावाची पाटी ठेवण्यात आलेली आहे. जेव्हा नवर्याने शिवाजी महाराज चौकात अडवली तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड राडा झाला. बघ्याची गर्दी वाढली. त्यामुळे काही काळ या भागातील वाहतुक ठप्प झाली. या प्रकरणी पोलिसांत काही दाखल की नाही ? या बाबत शिवाजी नगर पोलिसांकडे माहिती उपलब्ध नाही. परंतुया घटनेने पोलिसांच्या चारित्र्यासह वाहतूक कोंडी आणि चर्चा मात्र बीड शहरात चांगलीच रंगली.
ReplyForwardAdd reaction








