
बीड (रिपोर्टर)ः- तालुक्यातील धनगरवाडीत चोरीची घटना घडली असून चोरट्याने घराचे कुलूप तोडून आतील नगदी रक्कम व दागीने असा एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडू बाबुराव लकडे वय 50 वर्ष रा, धनगरवाडी यांच्या गेटचे व घराचे कूलुप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन घरातील 2 लाख 80 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला. आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे लकडे यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






