
दोन दिवसांनी पोलिसांना समजले
आता आरोपी अटक, तपास सुरू
बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहरातील मंत्री गल्ली भागात राहणार्या एका 22 वर्षीय तरूणास चाकुने भोसकल्याची घटना 2 ऑक्टोंबर रोजी घडली. सदरील जखमी तरूणास रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
विशाल आश्रुबा बेदरे (वय 22 रा.मंत्री गल्लली) या तरूणास श्रीनिवास जगन्नाथ बुरांडे या तरूणास 2 ऑक्टोबर रोजी चाकूने भोसकले. यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता यामधून ही घटना घडली. जखमी बेदरे यास रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी आरोपी बुरांडे यासह पोलिसांनी ताब्यात घेतले.





