
मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावरील घटना
बीड (रिपोर्टर): पायी जात असणार्या एका तरुणास पाठीमागून पिकअपने जोराची धडक दिल्याने या अपघातात जखमी तरुणास उपचारार्थ पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान सदरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर घडली.
पप्पू विश्वंभर वाघमारे (रा. सौंदाना, वैद्यकिन्ही ता. पाटोदा) हा तरुण मांजरसुंबा ते पाटोदा रोडने पायी जात असताना त्यास पाठीमागून पिकअप (क्र. एम.एच. 12 एच.एक्स. 3706) ने जोराची धडक दिली. या अपघातात सदरील तरुण गंभीररित्या जखमी झाल्याने त्यास पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान सदरील तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाटोदा पोलिसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








