
बीड (रिपोर्टर): वाळूचा कुठलाही ठेका सुरु नसताना काही वाळू माफिया चोरून वाळू घेऊन जात आहे, मादळमोही हद्दीतून एका टेम्पोतून वाळू जात असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी सदरील टेम्पो पकडला. या टेम्पोत 6 हजार रुपये किमतीची वाळू आढळून आली.
मादळमोही हद्दीतून टेम्पो (क्र. एम.एच. 23 ए.यू. 7029) यामध्ये वाळू जात असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी येम्पो पकडून त्यातील एक ब्रास वाळू जप्त केली. या प्रकरणी संजय गुजर याचंया फिर्यादीवरून आरोपी दादाराव दत्तू राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाळूसह टेम्पो जप्त केला.









