
शेतकर्यांची कर्जमाफी करून हेक्टरी 50 हजार द्या
बीड (रिपोर्टर): अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत तुटपुंजी असून हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान देऊन शेतकर्यांची कर्जमाफी करावी, या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मराठवाड्यातील शिवसैनिकांसह शेतकरी उपस्थित होते. मोर्चाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत जाहीर केली. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. शेतकर्यांना भरीव मदत करावी, हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर करावे तसेच अडचणीत असलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी त्यांची कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडास्तरीय मोर्चा काढला. या मोर्चाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.







