
गेवराई (रिपोर्टर)ः- गेवराई बसस्थानकातून जालन्याला जाण्यासाठी थांबलेल्या एका प्रवासी महिलेच्या बॅगमधून पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागीने चोरल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एक अनोळखी महिले विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुणा वैजीनाथ केसकर वय-55 वर्षे रा.जैताळवाडी ता.बीड ही महिला गेवराई बसस्थानकातून जालन्याला जाण्यासाठी थांबली असता महिलेच्या बॅग मधील मिनी गंठण, साखळी, डोरले इत्यादी दागीने महिला चोरटयाने चोरले. या दागीन्याची किंमत 1 लाख 73 हजार रुपये इतकी होती.या प्रकरणी अरुणा केसकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात महिला चोरटया विरोधात गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









