• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home कटाक्ष

कटाक्ष – कडू घास

by गणेश सावंत
October 31, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

इथ कारभारणीचं कुंकू पुसलं जातय. पांढर्‍या कपाळाने बांधावर नापीक झालेल्या शेताकडे पाहणारी शेतकरीन जेव्हा डोळ्यांसमोर उभी राहते तेव्हा शेतकर्‍यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार ऑपरेशन सिंदूर राबवणार का? असा जळजळीत सवाल उपस्थित होतो. मात्र बळीराजा मरतोय, मसनवाट्यात जातोय, सरणावर उभा आडवा पडतोय. याचं काही देणंघेणं राज्यकर्त्यांना नसल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होते. शेतकर्‍यांच्या आत्महत्या या केवळ आणि केवळ त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे होतात. हे उघड आहे. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरण्याऐवजी अधिक अधिक बिकट होते, तर शेतीमालाला भाव नाही, हे एकच कारण प्रकर्षाने समोर येते. ते सत्यही आहे. म्हणूनच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर इथं कोणी आवाज उठवला की इथला शेतकरी ताडकण उडतो आणि त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहतो. मात्र नेतृत्व करणारा ऐनवेळेस तलवार मॅन करून


पांढरं फडकं
फडकवतो आणि आपला लढा क्षमावतो. तेव्हा त्याने फडकावलेलं ते पांढरं फडकं दुसरं तिसरं काही नसतं तर मृत शेतकर्‍याच्या पोराने अग्निडाग दिल्यानंतर स्वत:च्या डोक्याला बांधलेलं ते फडकं असतं. असं आम्हाला अत्यंत गंभीरतेने हे मांडावासं वाटतं. उपराजधानीमध्ये गेली तीन दिवस राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकरी एकवटला. कर्जमाफीसह शेतकर्‍यांच्या अन्य न्यायिक मागण्या घेऊन तो सरकारशी दोनहात करायला तयार झाला. मात्र आंदोलनाचा फडशा पाडण्यात माहीर असलेल्या भाजपाने इथेही शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा फडशा पाडला. बैठका लावल्या आणि या बैठकांमध्ये केवळ शेतकर्‍यांना आश्वासना व्यतिरिक्त काहीच दिलं गेलं नाही. निवडणुकीपूर्वी महायुतीचं आश्वासन होतं सातबारा कोरा करण्याचं तेच आश्वासन पूर्ण करा म्हणत शेतकरी राजधानीत आंदोलनासाठी कठोरतेने उभा राहिला. सरकारकडून उत्तर काय मिळालं, समिती स्थापन करू आणि जून 2026 पर्यंत कर्जमाफी करू, म्हणजे इथे तीन तासाला एक आत्महत्या होते, पुढच्या आठ महिन्यात आणखी किती शेतकर्‍यांचे मृत्यू झाल्यानंतर हे सरकार कर्जमाफीचा


कडू घास
खायला देणार? आम्हाला खरंतर आश्चर्य वाटलं जेव्हा बच्चू कडू आम्हाला फक्त तारीख हवी होती, असं वक्तव्य केल्याचं फडणविसांच्या वक्तव्याचं आम्हाला काहीच वाटलं नाही. कारण या बोटावरचा थुका त्या बोटावर नेण्यात फडणविस परींद आहेत. या आठ महिन्यांच्या कालखंडामध्ये बरंच काही होऊ शकतं. बच्चू कडू यांच्यावरचे जुने खटले उकरून काढले जाऊ शकतात, हवा महल प्रकरण उजेडात आणलं जाऊ शकतं. त्यांना मंत्रीमंडळात संधी दिली जाऊ शकते. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या एका फोनवर कडू गुहाटी व्हाया कामख्यदेवीला जाऊ शकतात. आत्ता कुठं वाचकांच्या डोक्यात काहीसा प्रकाश पडला असेल, हे सर्व उदाहरणे आम्ही तेवढ्यासाठीच दिले, या आधीही शेतकर्‍यांचं आंदोलन झालं, त्यावेळी एका एका शेतकरी नेत्याला आडोश्याला नेत भाजप सरकारने त्या नेत्याचं काय केलं? हे उभ्या महाराष्ट्राने यापूर्वी पाहितलच. बच्चू कडू काल चर्चेला गेले तेव्हा ते वाघासारखे गुरगुरत होते. चर्चेतून बाहेर आले तेव्हा


कडू हे बच्चू दिसले
ते जेव्हा माध्यमांसमोर बोलत होते तेव्हा माध्यमांच्या प्रश्‍नाला ते रोखठोक उत्तर देऊ शकत नव्हते. आंदोलन मागे घेणार का? हा प्रश्‍न पत्रकार विचारत होते. तेव्हा बच्चू कडू हे आंदोलन नेत्यांना विचारा, असं म्हणत होते. इथे आंदोलनाचा चेहरा तुम्ही आहात, मग बच्चू भाऊ अन्य नेत्यांना काय विचारायचं? आंदोलन तुम्ही सुरू केलं, मग ते मागं घ्यायचं की नाही हे तुम्हीच ठरवणार ना? बच्चू भाऊची भाषा आणि देहबोली ओरडून सांगत होती, जी चर्चा झाली, जे निर्णय झाले त्यावर स्वत: बच्चू भाऊच समाधानी नव्हते. होय, आम्हीही शेतकरी आहोत, त्याचबरोबर इथल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांचा आवाज म्हणून आम्हीही बोलत राहतो, लिहित राहतो. त्यामुळे चळवळ काय असते हे आम्हाला माहित आहे, आंदोलन काय असतात हेही आम्हाला ठाऊक आहे. सर्वच मागण्या मान्य होत नसतात हेही आम्ही पुरते जाणतो. मात्र काल ज्या पद्धतीने सातबारा कोरा करण्याबाबत उभारलेल्या आंदोलनाची समाप्ती झाली ती समाप्ती होती की, ढवारा? हा प्रश्‍नच बच्चू कडू छातीठोपणे आम्ही सरकारला तारीख सांगायला भाग पाडले, असं म्हणत असले तरी सरकारकडून जे काही उत्तर मिळाले आहे ते या आंदोलनाची यशोगाथा म्हणताच येणार नाही. सरकार शेतकर्‍यांच्या बाबत गांभीर्याने घेत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या आंदोलनातून एक मात्र लक्षात आले, आंदोलनाचा फडशा पाडण्यासाठी सरकार साम-दाम-दंडाबरोबर आता लोकशाहीतील स्तंभांचा जाहीर वापर करते. काल न्यायालयाचा आदेश आणि त्या आदेशाची न होणारी अंमलबजावणी म्हणजे शेतकर्‍यांच्या अवहेलनेसारखीच न्यायालयाची अवहेलना. आंदोलनातून काही भेटलं की नाही या प्रश्‍नाचं उत्तर म्हणजेच कडू घास.

Previous Post

माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ;

Next Post

यश ढाका खून प्रकरणातील मास्टरमाइंडवर गुन्हा दाखल करा

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post

यश ढाका खून प्रकरणातील मास्टरमाइंडवर गुन्हा दाखल करा

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?