
चार ठिकाणी दुकान फोडल्या
लाखोचा मुद्देमाल लंपास
माजलगाव (रिपोर्टर): शहरातील जुना मोढा परिसर पुन्हा एकदा चोरट्यांच्या निशाण्यावर आला आहे.गुरुवारच्या मध्यरात्री या भागात तीन ठिकाणी दोन किराणा दुकान, एक मेडिकल व बीड रोडवरील सिमेंट दुकान फोडण्यात आली.दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदरील दुकानातून नगदी रकमेसह लाखोचा मुद्देमाल लंपास केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या मोढा भागातील कुलदीप सोळंके यांचे न्यू जय भवानी ट्रेडिंग कंपनीकिराणा दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील 16 हजार रुपये कॅश व ड्रायफूट असा 56 हजार रुपयाचे किराणा सामान चोरून नेले.तर याच ठिकाणी घाईतिडक यांच्या तुळजाभवानी किराणा दुकानाचे शटर तोडून नुकसान केले. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील जगदीश मेडिकल फोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला.दरम्यान गेवराई रोडवर साबळे हॉस्पिटल समोर असणारे इंजिनीयर भोसले यांचे सांडेश्वर ट्रेडिंग सिमेंटचे दुकान फोडून गल्ल्यातील 3 लाख 49 हजार रुपये नेले.यावेळी चोरट्यांनी दुकानातील सीडीआरचेही नुकसान केले.पोलीसानी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू केला आहे.प्राथमिक तपासात बाहेरच्या एकाच टोळीने ही सर्व चोर्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.दरम्यान अज्ञात चोरट्याविरोधात माजलगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









