
83 हजाराचा मुद्देमाल पळविला
बीड (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातील बोरगाव चकला येथे घरफोडीची घटना घडली असून चोरट्याने घरातील साड्यांसह नगदी रक्कम असा एकूण 83 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बबन दादाबा झिंझुर्डे (रा. बोरगाव चकला) यांच्या घराचे अज्ञात चोरट्यघाने कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील साड्या, नगदी ऐंशी हजार रुपये असा एकूण 83 हजार 700 रुपयांचा माल चोरून नेला. आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे झिंझुर्डे याचंया लक्षात आल्यानंतर त्यांनी चकलांबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरटट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






