
सीसीटीव्हीत कैद, बसस्थानकातून दागिने चोरले
बीड (रिपोर्टर): शहरामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ जाली असून तुमचे दागिने पिशवीत काढून ठेवा, असा सल्ला देणार्या एका महिला चोरट्याने महिलेच्या पिशवीतील दागिने चोरल्याचा प्रकार पाटोदा येथे घडला आहे. सदरील दागिने चोर महिला सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
चंद्रभागा बापू शिंदे (रा. फक्राबाद ता. जामखेड) यांना एका अज्ञात महिलेने ‘तुमच्या गळ्यातील दागिने पिशवीत ठेवा, चोर्या वाढल्या आहेत3 असे सांगितल्याने महिलेने आपले दागिने पिशवीत ठेवले असता सदरील हे दागिने महिला चोराने लंपास केले. दागिने चोरणारी महिला सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






