बीड (रिपोर्टर): समुद्रात सापडणार्या अति दुर्मिळ व्हेल मासा याची उलटीचा पदार्थ विकणार्या दोन तस्करांना काल बालेपीर भागातून शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
व्हेल मास्याची उलटी विकण्यासाठी पुणे येथून दोन जण बीड येथे आले होते. ही गुप्त माहिती शिवाजीनगर पोलिसांना झाल्यावरून पोलिसांनी डमी ग्राहक तयार करून या माणसांच्या संपर्कात आणला आणि त्यावरून व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणार्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई नव्यानेच पदभार स्विकारणारे पोलीस निरीक्षक बांगर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी केली. दरम्यान, वेल माश्याच्या उलटीतून निघणारे द्रवपदार्थ हे अत्तर बनविण्यासाठी उपयोगाला येतात त्यामुळे त्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.







