टँकर दुचाकीचा अंबाजोगाई बीड रोड लोखंडी सावरगांव च्या पुढे कळब चौकात झाला अपघात
तरुण व्यावसायिकाच्या अपघाती मृत्यूने शोककळा
आष्टी (रिपोर्टर):-बिकट परिस्थितीशी संघर्ष करत यशस्वी उद्योजकापर्यंतचा प्रवास करणार्या आष्टी शहरातील प्रसिद्ध एसपी कलेक्शन या नावाने सोमनाथ पवार यांनी व्यावसायाची अल्पावधीतच नावारुपाला आणून स्वकर्तृत्वावर कापड व्यवसाया मध्ये आपले स्थान निर्माण केले होते. लातूर या ठिकाणी दुकान मालाची ऑर्डर देण्यासाठी बुधवारी सकाळी जात असताना आंबेजोगाई शहराजवळ लोखंडी सावरगांव येथील कळब चौकामध्ये वळवावरती दुचाकी व टँकर च्या भीषण अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुण व्यावसायिकाची दुर्दैवी घटना घडल्याने आष्टी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मृत्युने कापड व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की आष्टी शहरातील एसपी मेन्स वेअर या कापड दुकान चे मालक सोमनाथ पवार हे आपल्या व्यवसायाच्या माल खरेदीसाठी ऑर्डर देण्यासाठी लातूर या ठिकाणी दुचाकी वरून बुधवारी दि.17 डिसेंबर रोजी जात असताना आंबेजोगाई शहराजवळ लोखंडी सावरगाव येथील कळब चौकाच्या वळणावर टँकर क्रं.चक 16 उऊ 1617 ने दुचाकी ला जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की अपघातामध्ये दुचाकीस्वार कापड व्यावसायिक सोमनाथ पवार वय वर्ष 38 रा.आष्टी ता.आष्टी जि.बीड यांचा जागीच मृत्यू झाला आहे.त्यांच्या मृतदेह अंबाजोगाई येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.अपघाताची माहिती मयत व्यापार्यांच्या नातेवाईकांना दिली असून ते अंबाजोगाईकडे रवाना झाले आहेत.
त्यांच्या पश्चात आई,वडील,2 भाऊ,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता.त्यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे











